॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १०६ बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा। विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा॥ दया सर्वभुतीं जया मानवाला। सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥

॥ १०६ ॥

मनाचे श्लोक १०६ अर्थ — मराठी

एकनिष्ठेने स्नान-संध्या नीट करावी; विवेकाने स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला आवरावे. ज्या माणसाच्या ठिकाणी सर्व भूतांविषयी दया आहे, तो सदा प्रेमळ भक्तिभावाने निवाला असतो.

Manache Shlok 106 Meaning — English

Perform your daily rites with single-minded devotion; through discernment restrain the wandering mind. The person who holds compassion for all beings is ever cooled by loving devotion.