॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ११७ धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे

धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे। कृपा भाकितां दीधली भेटी जेणे॥ चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥

॥ ११७ ॥

मनाचे श्लोक ११७ अर्थ — मराठी

बापुडे, दैन्यवाणे धुव्र लेकरू कृपेची याचना करताच देवाने त्याला भेट दिली. त्या प्रेमखाणीला तारांगणात चिरंजीव केले; तो देव भक्ताचा अभिमानी कधीही उपेक्षा करत नाही.

Manache Shlok 117 Meaning — English

The poor, helpless child Dhruva, on begging for grace, was granted the Lord's darshan. That loving one was made immortal among the stars; that God never forsakes his devotees.