॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १२ मना मानसीं दु:ख आणूं नको रे

मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥

॥ १२ ॥

मनाचे श्लोक १२ अर्थ — मराठी

हे मना, मनात दुःख आणू नकोस; शोक आणि चिंता मुळीच करू नकोस. विवेकाने देहबुद्धी सोडून द्यावी आणि देहाच्या पलीकडे जाऊन मुक्तीचा अनुभव घ्यावा.

Manache Shlok 12 Meaning — English

O mind, do not bring sorrow upon yourself, and never give in to grief and worry. Through discernment, let go of identifying with the body, and live the freedom that lies beyond it.