॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १४५ सदा वीषयो चिंतितां जीव जाला

सदा वीषयो चिंतितां जीव जाला। अहंभाव अज्ञान जन्मास आला॥ विवेके सदा स्वस्वरुपी भरावे। जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें॥

॥ १४५ ॥

मनाचे श्लोक १४५ अर्थ — मराठी

सदा विषयांचे चिंतन केल्याने जीव विषयमय झाला; अहंभाव आणि अज्ञान जन्माला आले. विवेकाने सदा आपल्या स्वरूपात भरून राहावे; उगमीच (मूळ स्वरूपात) राहिल्यास स्वभावतः जन्म नाही.

Manache Shlok 145 Meaning — English

By ever brooding on sense-objects the soul became bound to them; ego and ignorance were born. Through discernment abide always in your true self; resting at the source, there is naturally no rebirth.