॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १५३ नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने

नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने। समाधान कांही नव्हे तानमाने॥ नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें। समाधान ते सज्जनाचेनि योगे॥

॥ १५३ ॥

मनाचे श्लोक १५३ अर्थ — मराठी

ते पिंडज्ञानाने नाही, तत्त्वज्ञानाने नाही; समाधान तानमानाने (मानसन्मानाने) नाही. ते योग-यागाने नाही, भोग-त्यागाने नाही; समाधान हे केवळ सज्जनांच्या संगतीने लाभते.

Manache Shlok 153 Meaning — English

Not through knowledge of the body, nor of the elements; contentment comes not through honour or pride. Not through yoga or sacrifice, not through indulgence or renunciation — peace comes only through the company of the good.