मनें कल्पिला वीषयो सोडवावा। मनें देव निर्गूण तो ओळखावा॥ मनें कल्पिता कल्पना ते सरावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥
॥ १६४ ॥मनाचे श्लोक १६४ मनें कल्पिला वीषयो सोडवावा
मनाचे श्लोक १६४ अर्थ — मराठी
मनाने कल्पिलेला विषय सोडवावा; मनानेच निर्गुण देव ओळखावा. मनाने कल्पिलेली कल्पना सरावी (संपावी); आणि सदा सज्जनांची संगत धरावी.
Manache Shlok 164 Meaning — English
Release the sense-object the mind has imagined; through the mind itself recognise the formless God. Let the fancy the mind has spun come to an end; and always keep the company of the good.