॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक २०१ कदा ओळखीमाजि दूजे दिसेना

कदा ओळखीमाजि दूजे दिसेना। मनी मानसी द्वैत काही वसेना॥ बहूता दिसा आपली भेट जाली। विदेहीपणे सर्व काया निवाली॥

॥ २०१ ॥

मनाचे श्लोक २०१ अर्थ — मराठी

त्या ओळखीत दुसरे काही दिसत नाही; मनात द्वैताचा लेशही वसत नाही. पुष्कळ दिवसांनी आपली आपली भेट झाली; विदेहीपणाने सर्व काया निवाली.

Manache Shlok 201 Meaning — English

In that recognition nothing else appears; not a trace of duality dwells in the mind. After many days one meets one's own self; in bodilessness the whole being is cooled.