॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ३२ अहल्या शिळा राघवें मुक्त केली

अहल्या शिळा राघवें मुक्त केली। पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥

॥ ३२ ॥

मनाचे श्लोक ३२ अर्थ — मराठी

रामाने शिळा झालेल्या अहल्येला मुक्त केले; त्याच्या चरणस्पर्शाने ती दिव्य होऊन गेली. ज्याचे वर्णन करताना वेदवाणीही थकून जाते, तो राम दासाचा अभिमानी कधीही उपेक्षा करत नाही.

Manache Shlok 32 Meaning — English

Rama freed Ahalya, who had turned to stone; at the touch of his feet she became radiant and pure. He whom even the voice of the Vedas tires to describe — that Rama never forsakes his devotees.