अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना। अती काम त्या राम चित्ती वसेना॥ अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा। अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥
॥ ६४ ॥मनाचे श्लोक ६४ अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना
मनाचे श्लोक ६४ अर्थ — मराठी
अति मूढाला दृढ बुद्धी नसते; अति कामी माणसाच्या चित्तात राम वसत नाही. अति लोभी माणसाला क्षोभ होतो हे जाण; अति विषयी माणूस सदा दैन्यवाणा असतो.
Manache Shlok 64 Meaning — English
The utterly foolish have no steady wisdom; in the deeply lustful mind Rama does not dwell. Know that the very greedy meet turmoil; the one lost in sense-pleasures is always wretched.