॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ७१ जयाचेनि नामें महादोष जाती

जयाचेनि नामें महादोष जाती। जयाचेनि नामें गती पाविजेती॥ जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा। प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥

॥ ७१ ॥

मनाचे श्लोक ७१ अर्थ — मराठी

ज्या नामाने महादोष नाहीसे होतात, ज्या नामाने उत्तम गती मिळते, ज्या नामाने पुण्याचा ठेवा जमतो, म्हणून पहाटे मनात रामाचे चिंतन करावे.

Manache Shlok 71 Meaning — English

By whose name great sins are destroyed, by whose name a noble destiny is gained, by whose name a store of merit is gathered — so at dawn contemplate Rama in the mind.