॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ८१ मना मत्सरे नाम सांडूं नको हो

मना मत्सरे नाम सांडूं नको हो। अती आदरे हा निजध्यास राहो॥ समस्तांमधे नाम हे सार आहे। दुजी तूळणा तूळितांही न साहे॥

॥ ८१ ॥

मनाचे श्लोक ८१ अर्थ — मराठी

हे मना, मत्सराने रामनाम सोडू नकोस; अति आदराने त्याचा निजध्यास राहो. सर्वांमध्ये हे नामच सार आहे; दुसरी कोणतीही तुलना त्याच्यापुढे टिकत नाही.

Manache Shlok 81 Meaning — English

O mind, do not abandon Rama's name out of envy; let its constant remembrance stay with deep reverence. Among all things this name is the essence; no other comparison can stand before it.