॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १० सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी

सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी। दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥ देहेदु:ख ते सूख मानीत जावे। विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें॥

॥ १० ॥

मनाचे श्लोक १० अर्थ — मराठी

नेहमी, सर्वकाळ रामावर प्रीती धरावी आणि दुःखाचा त्याग आपण स्वतःच जिवातून करावा. देहाला होणारे दुःखही सुख मानत जावे आणि विवेकाने सदैव आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर राहावे.

Manache Shlok 10 Meaning — English

Hold love for Rama at all times, and cast sorrow out of your own heart yourself. Learn to accept even bodily pain with ease, and through discernment abide always in your true self.