नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे॥
॥ ९ ॥मनाचे श्लोक ९ नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
मनाचे श्लोक ९ अर्थ — मराठी
हे मना, दुसऱ्याच्या धनाचा लोभ धरू नकोस. अति स्वार्थबुद्धीने पापच साचत जाते. खोट्या कर्मांचे फळ भोगावेच लागते, आणि मनासारखे झाले नाही की मोठे दुःख होते.
Manache Shlok 9 Meaning — English
O mind, do not covet what belongs to others; excessive selfishness only piles up sin. False deeds must be paid for in suffering, and when things don't go the mind's way, great sorrow follows.