॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ८ देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥ मना चंदनाचे परी त्वां झिजावे। परी अंतरीं सज्जना नीववावे॥

॥ ८ ॥

मनाचे श्लोक ८ अर्थ — मराठी

देह सोडल्यावरही आपली कीर्ती मागे उरावी, असेच आचरण हे सज्जन मना, तू धरावेस. चंदनाप्रमाणे स्वतः झिजावे, पण झिजता झिजता सज्जनांच्या अंतःकरणाला शीतलता द्यावी.

Manache Shlok 8 Meaning — English

Live such that your good name remains even after the body is gone — o good mind, hold to such action. Wear yourself away like sandalwood, soothing and cooling the hearts of others even as you do.