॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ७ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावें॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसि रे नीववावें॥

॥ ७ ॥

मनाचे श्लोक ७ अर्थ — मराठी

हे मना, मोठे धैर्य जिवात धरावे आणि इतरांचे कटू बोलणे सहन करत जावे. स्वतः मात्र नेहमी नम्र वाणीने बोलावे आणि सर्व लोकांना शांत, समाधानी करावे.

Manache Shlok 7 Meaning — English

O mind, hold great courage in your heart, and learn to endure the harsh words of others. Speak always with humility yourself, and bring calm and comfort to everyone around you.