॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ६ नको रे मना क्रोध हा खेदकारी

नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥

॥ ६ ॥

मनाचे श्लोक ६ अर्थ — मराठी

हे मना, दुःख देणारा क्रोध नको. नाना विकार निर्माण करणारा काम (वासना) नको. लोभ कधीही अंगीकारू नकोस, आणि मत्सर व दंभाचे ओझेही वाहू नकोस.

Manache Shlok 6 Meaning — English

O mind, do not hold on to anger, which brings only sorrow; nor to lust, which breeds countless distortions. Never embrace greed, and never carry the burden of jealousy and hypocrisy.