॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १०४ क्रियेवीण नानापरी बोलिजेंते

क्रियेवीण नानापरी बोलिजेंते। परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें॥ मना कल्पना धीट सैराट धांवे। तया मानवा देव कैसेनि पावे॥

॥ १०४ ॥

मनाचे श्लोक १०४ अर्थ — मराठी

क्रियेवाचून नाना प्रकारे बोलले जाते, पण दुश्चित्त झालेले चित्त तेच लाजवते. मनाची कल्पना धीट होऊन सैरावैरा धावते; अशा माणसाला देव कसा प्राप्त होणार?

Manache Shlok 104 Meaning — English

Much is spoken in many ways without action, but the restless mind itself brings shame. Fancy grows bold and races about; how can such a person attain God?