॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १०३ हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी

हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी। देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी॥ परद्रव्य आणीक कांता परावी। यदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥

॥ १०३ ॥

मनाचे श्लोक १०३ अर्थ — मराठी

हरिकीर्तनात रामावर प्रीती धरावी आणि निरूपणात देहबुद्धी विसरावी. परक्याचे धन आणि परक्याची स्त्री — या गोष्टींची वासना, हे मना, जिवातून सोडून द्यावी.

Manache Shlok 103 Meaning — English

In singing Hari's glory hold love for Rama, and in contemplation forget the body-idea. Craving for others' wealth and others' spouse — O mind, cast such desire out of your heart.