अती लीनता सर्वभावे स्वभावें। जना सज्जनालागिं संतोषवावे॥ देहे कारणीं सर्व लावीत जावें। सगूणीं अती आदरेसी भजावें॥
॥ १०२ ॥मनाचे श्लोक १०२ अती लीनता सर्वभावे स्वभावें
मनाचे श्लोक १०२ अर्थ — मराठी
सर्व भावाने स्वभावतः अति नम्रता धरावी आणि सज्जनांना संतोष द्यावा. देह सर्व सत्कारणी लावावा आणि सगुणाची अति आदराने भक्ती करावी.
Manache Shlok 102 Meaning — English
Hold deep humility naturally in every feeling, and bring contentment to the good. Devote the whole body to worthy ends, and worship the divine form with great reverence.