जया नावडे नाम त्या यम जाची। विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची॥ म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे। मुखे बोलतां दोष जाती स्वभावें॥
॥ १०१ ॥मनाचे श्लोक १०१ जया नावडे नाम त्या यम जाची
मनाचे श्लोक १०१ अर्थ — मराठी
ज्याला नाम आवडत नाही त्याला यम जाचतो; विकल्पातून तर्क उठला की नरकच वाट्याला येतो. म्हणून अति आदराने नाम घ्यावे; मुखाने बोलताच दोष स्वभावतःच नाहीसे होतात.
Manache Shlok 101 Meaning — English
One who dislikes the name is tormented by death; when doubt breeds argument, hell alone results. So take the name with deep reverence; the moment it is spoken, faults naturally fall away.