जनांकारणे देव लीलावतारी। बहुतांपरी आदरें वेषधारी॥ तया नेणती ते जन पापरूपी। दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी॥
॥ १२६ ॥मनाचे श्लोक १२६ जनांकारणे देव लीलावतारी
मनाचे श्लोक १२६ अर्थ — मराठी
जनांसाठी देव लीलेने अवतार घेतो आणि अनेक प्रकारे आदराने वेष धारण करतो. पण पापरूपी, दुरात्मे, महानष्ट, चांडाळ अशी माणसे त्याला ओळखत नाहीत.
Manache Shlok 126 Meaning — English
For the people God takes playful incarnations, assuming many forms with grace. Yet sinful, wicked, utterly lost and degraded people fail to recognise Him.