॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १२७ जगीं धन्य तो रामसूखें निवाला

जगीं धन्य तो रामसूखें निवाला। कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला॥ देहेभावना रामबोधे उडाली। मनोवासना रामरूपीं बुडाली॥

॥ १२७ ॥

मनाचे श्लोक १२७ अर्थ — मराठी

जो रामसुखाने निवाला तो जगात धन्य; कथा ऐकताना तो सर्वस्वी तल्लीन झाला. रामबोधाने त्याची देहभावना उडाली आणि मनोवासना रामरूपात बुडाली.

Manache Shlok 127 Meaning — English

Blessed in the world is one cooled by the joy of Rama, wholly absorbed in listening to his story. By Rama's wisdom his body-sense dissolved, and the mind's cravings sank into Rama's form.