॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १३५ धरीं रे मना संगती सज्जनाची

धरीं रे मना संगती सज्जनाची। जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची॥ बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे। महाक्रुर तो काळ विक्राळ भंगे॥

॥ १३५ ॥

मनाचे श्लोक १३५ अर्थ — मराठी

हे मना, सज्जनांची संगत धर, जिने दुर्जनाची वृत्तीही पालटते. तिच्या बळाने सद्भाव, सद्बुद्धी आणि सन्मार्ग लाभतो; आणि महाक्रूर, विक्राळ काळही भंगतो.

Manache Shlok 135 Meaning — English

O mind, keep the company of the good, which changes even a wicked disposition. By its power come good feeling, good sense and the right path; and even cruel, fearsome death is broken.