॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १३६ भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे

भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे। भयातीत तें संत आनंत पाहे॥ जया पाहतां द्वैत कांही दिसेना। भयो मानसीं सर्वथाही असेना॥

॥ १३६ ॥

मनाचे श्लोक १३६ अर्थ — मराठी

सर्व ब्रह्मांड भयाने व्यापले आहे, पण भयातीत असा तो अनंत संतच पाहतो. ज्याला पाहताच कोणतेही द्वैत दिसत नाही, त्याच्या मनात भय मुळीच उरत नाही.

Manache Shlok 136 Meaning — English

Fear pervades the whole universe, but the infinite saint, beyond fear, alone perceives the truth. In one before whom no duality appears, fear does not remain at all.