॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १३७ जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले

जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले। परी जीव अज्ञान तैसेचि ठेले॥ देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना। जुने ठेवणें मीपणें आकळेना॥

॥ १३७ ॥

मनाचे श्लोक १३७ अर्थ — मराठी

श्रेष्ठ पुरुषांनी जिवांना स्पष्टपणे सांगून ठेवले, तरी अज्ञानी जीव तसेच राहिले. देहबुद्धीचे खोटे कर्म टळत नाही; 'मी'पणामुळे ते जुने ठेवणे (आत्मरूप) आकळत नाही.

Manache Shlok 137 Meaning — English

The great ones told souls plainly, yet the ignorant remained as they were. The false doings of body-identity do not cease; through 'I'-ness the ancient treasure (the Self) is not grasped.