॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १५ मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥

॥ १५ ॥

मनाचे श्लोक १५ अर्थ — मराठी

हे मना, नीट पाहिलेस तर ही खरोखर मृत्यूचीच भूमी आहे. जिवंत असताना सर्व जीव 'मी, मी' म्हणतात आणि स्वतःला चिरंजीव मानतात, पण अकस्मात सर्व काही सोडून निघून जातात.

Manache Shlok 15 Meaning — English

O mind, look closely — this is truly a land of death. While alive, every creature asserts 'I, I' and imagines itself immortal, yet all at once each leaves everything behind and departs.