॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १५५ दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे

दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे। बरे पाहता गूज तेथेचि आहे॥ करी घेउ जाता कदा आढळेना। जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥

॥ १५५ ॥

मनाचे श्लोक १५५ अर्थ — मराठी

जे जनांना दिसत नाही तेच शोधून पाहा; नीट पाहिले तर गूज तिथेच आहे. हाताने घ्यायला जावे तर ते कधी सापडत नाही; सर्वांत कोंदलेले (भरलेले) असूनही कळत नाही.

Manache Shlok 155 Meaning — English

Search for that which people do not see; look well, and the secret is right there. Reach to grasp it and it is never caught; though it fills everything, it is not known.