॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १६७ बरा निश्चयो शाश्वताचा करावा

बरा निश्चयो शाश्वताचा करावा। म्हणे दास संदेह तो वीसरावा॥ घडीने घडी सार्थकाची धरावी। सदा संगती सज्जनांची धरावी॥

॥ १६७ ॥

मनाचे श्लोक १६७ अर्थ — मराठी

शाश्वताचा (नित्य सत्याचा) बरा निश्चय करावा; दास म्हणतो, संदेह विसरावा. घडोघडी सार्थकाची (कल्याणाची) कास धरावी; आणि सदा सज्जनांची संगत धरावी.

Manache Shlok 167 Meaning — English

Make a firm resolve upon the eternal; the servant says, forget all doubt. Moment by moment hold to what is worthwhile; and always keep the company of the good.