॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १६८ करी वृत्ती जो संत तो संत जाणा

करी वृत्ती जो संत तो संत जाणा। दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥ उपाधी देहेबुद्धीते वाढवीते। परी सज्जना केविं बाधु शके ते॥

॥ १६८ ॥

मनाचे श्लोक १६८ अर्थ — मराठी

जो सतत सत्-वृत्तीने वागतो तोच संत जाणावा; जो दुराशेने दैन्यवाणा होत नाही. उपाधी देहबुद्धीला वाढवते, पण ती सज्जनाला कशी बाधणार?

Manache Shlok 168 Meaning — English

Know as a saint one who ever acts from a pure disposition, who is not made wretched by craving. Entanglement swells body-consciousness, but how can it bind the good?