देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी। विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी॥ तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे। म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे॥
॥ १७० ॥मनाचे श्लोक १७० देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी
मनाचे श्लोक १७० अर्थ — मराठी
देहबुद्धी ज्ञानबोधाने त्यागावी; विवेकाने त्या वस्तूची (आत्मतत्त्वाची) भेट घ्यावी. ती तद्रूप वृत्ती स्वभावतः राहत नाही; म्हणून सदा तेच शोधत जावे.
Manache Shlok 170 Meaning — English
Give up body-consciousness through the light of knowledge; with discernment meet that Reality. That absorbed state does not remain of itself; so keep ever searching for it.