॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १८ मना राघवेंवीण आशा नको रे

मना राघवेंवीण आशा नको रे। मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥ जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें। तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे॥

॥ १८ ॥

मनाचे श्लोक १८ अर्थ — मराठी

हे मना, रघुनाथावाचून दुसरी कोणतीही आशा धरू नकोस; माणसांकडून मिळणाऱ्या कीर्तीचीही इच्छा करू नकोस. ज्याचे वर्णन वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात, त्याचेच वर्णन करणे सर्वांत श्लाघ्य आहे.

Manache Shlok 18 Meaning — English

O mind, place no hope in anything but Raghunatha, and do not crave fame from other people. The one whom the Vedas, scriptures and Puranas describe — to praise Him alone is most worthy.