॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १७ मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते। अकस्मात होणार होऊनि जाते॥ घडें भोगणे सर्वही कर्मयोगे। मतीमंद तें खेद मानी वियोगें॥

॥ १७ ॥

मनाचे श्लोक १७ अर्थ — मराठी

हे मना, माणूस व्यर्थ चिंता वाहतो; जे घडायचे ते अकस्मात घडूनच जाते. सर्व काही कर्मानुसारच भोगावे लागते; मंदबुद्धीचा माणूस मात्र वियोगाने खेद मानतो.

Manache Shlok 17 Meaning — English

O mind, a person carries needless worry; what is meant to happen happens all at once regardless. Everything must be borne according to one's karma; only the dull-witted grieve over what is lost.