नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु। नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥ नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू। जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू॥
॥ १८१ ॥मनाचे श्लोक १८१ नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु
मनाचे श्लोक १८१ अर्थ — मराठी
जो चेटकी, फसवणारा, द्रव्यभोंदू नाही, जो निंदक, मत्सरी, भक्तिहीन नाही, जो उन्मत्त, व्यसनी किंवा वाईट संगतीचा नाही — तोच अगाध ज्ञानी साधू जाणावा.
Manache Shlok 181 Meaning — English
One who is no sorcerer, deceiver or money-cheat, no slanderer, envier or devotionless soul, no arrogant, addicted or ill-companioned man — he alone is the profound, wise sadhu.