॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १८२ नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी

नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी। क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥ मुखे बोलिल्यासारिखे चालताहे। मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे॥

॥ १८२ ॥

मनाचे श्लोक १८२ अर्थ — मराठी

ज्याच्या पोटी व्यर्थ चहाटळपणा (बडबड) आणि काम नाही, ज्याची क्रियेवाचून केवळ वाचाळता नाही, जो बोलल्याप्रमाणे वागतो — हे मना, तोच सद्गुरू शोधून पाहा.

Manache Shlok 182 Meaning — English

One with no idle prattle or lust within, who is not all talk without action, who acts as he speaks — O mind, seek out such a one as the true guru.