जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी। कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥ प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे। तयाचेनि योगे समाधान बाणे॥
॥ १८३ ॥मनाचे श्लोक १८३ जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी
मनाचे श्लोक १८३ अर्थ — मराठी
जो भक्त, ज्ञानी, विवेकी, विरागी, कृपाळू, मनस्वी, क्षमावंत योगी आहे, जो समर्थ, दक्ष, व्युत्पन्न आणि चातुर्य जाणणारा आहे — त्याच्या योगाने समाधान अंगी बाणते.
Manache Shlok 183 Meaning — English
One who is devoted, wise, discerning, dispassionate, merciful, high-minded, forgiving, a yogi — capable, alert, learned and skilful — through him contentment takes root in you.