॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १८६ सदा सर्वदा राम सन्नीध आहे

सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधुन पाहे॥ अखंडीत भेटी रघूराजयोगू। मना सांडीं रे मीपणाचा वियोगू॥

॥ १८६ ॥

मनाचे श्लोक १८६ अर्थ — मराठी

राम सदा सर्वकाळ जवळच आहे; हे सज्जन मना, सत्य शोधून पाहा. रघुराजाशी अखंड भेट (योग) आहे; हे मना, 'मी'पणाचा वियोग सोडून दे.

Manache Shlok 186 Meaning — English

Rama is ever near at all times; O good mind, search out the truth. There is unbroken union with Raghava; O mind, give up the separateness of 'I'-ness.