॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १८७ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे

भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे। परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥ मना भासले सर्व काही पहावे। परी संग सोडुनि सुखी रहावे॥

॥ १८७ ॥

मनाचे श्लोक १८७ अर्थ — मराठी

भूते, पिंड आणि ब्रह्मांड हे ऐक्यरूप आहे, पण हे सर्व स्वस्वरूपात टिकत नाही. हे मना, जे भासले ते सर्व पाहावे, पण संग सोडून सुखी राहावे.

Manache Shlok 187 Meaning — English

The elements, the body and the cosmos are one, yet none of it abides in the pure Self. O mind, observe all that appears, but let go of attachment and remain at peace.