नभासारिखे रुप या राघवाचे। मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥ तया पाहता देहबुद्धी उरेना। सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना॥
॥ १९७ ॥मनाचे श्लोक १९७ नभासारिखे रुप या राघवाचे
मनाचे श्लोक १९७ अर्थ — मराठी
या राघवाचे रूप आकाशासारखे आहे; मनात त्याचे चिंतन करताच संसाराचे मूळ तुटते. त्याला पाहताच देहबुद्धी उरत नाही; आणि पोटातील आर्तता (तळमळ) सदा पुरत नाही (शमत नाही).
Manache Shlok 197 Meaning — English
The form of Raghava is like the sky; contemplating Him, the root of worldly life is severed. On seeing Him, body-consciousness does not remain; and the deep longing within is never fully stilled.