मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥
॥ २ ॥मनाचे श्लोक २ मना सज्जना भक्तिपंथेचि जावें
मनाचे श्लोक २ अर्थ — मराठी
हे सज्जन मना, भक्तीच्याच मार्गाने जावे; म्हणजे श्रीहरी सहजपणे प्राप्त होतो. लोकांमध्ये जे निंदनीय आहे ते सर्व सोडून द्यावे आणि जे वंदनीय आहे ते सर्व मनापासून करावे.
Manache Shlok 2 Meaning — English
O good mind, walk the path of devotion — then Shri Hari is attained naturally. Give up everything that the world rightly condemns, and do wholeheartedly all that is worthy of respect.