॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ३ प्रभाते मनी राम चिंतीत जावा

प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥

॥ ३ ॥

मनाचे श्लोक ३ अर्थ — मराठी

पहाटे उठल्यावर मनात रामाचे चिंतन करावे आणि वाणीने प्रथम रामाचेच नाव उच्चारावे. सदाचार हा श्रेष्ठ आहे, तो कधीही सोडू नये; जो असे वागतो तोच माणूस जगात धन्य होतो.

Manache Shlok 3 Meaning — English

At dawn, contemplate Rama in the mind, and let Rama's name be the first word you speak. Never abandon right conduct, for it is the highest virtue; the one who lives this way is truly blessed among people.