॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ४ मना वासना दुष्ट कामा न ये रे

मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना धर्मता नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो॥

॥ ४ ॥

मनाचे श्लोक ४ अर्थ — मराठी

हे मना, दुष्ट वासना कोणत्याही कामाची नाही. मना, पापबुद्धी मुळीच धरू नकोस. धर्म आणि नीती कधीही सोडू नकोस, आणि अंतःकरणात नेहमी साराचा (तत्त्वाचा) विचार राहू दे.

Manache Shlok 4 Meaning — English

O mind, wicked desire serves no purpose; never harbour sinful intent. Do not abandon righteousness and morality, and let the contemplation of what is essential always dwell within you.