॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ३५ असे हो जया अंतरी भाव जैसा

असे हो जया अंतरी भाव जैसा। वसे हो तया अंतरी देव तैसा॥ अनन्यास रक्षीतसे चापपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥

॥ ३५ ॥

मनाचे श्लोक ३५ अर्थ — मराठी

ज्याच्या अंतःकरणात जसा भाव असतो, त्याच्या ठिकाणी देवही तसाच वसतो. अनन्य भक्ताचे रक्षण धनुर्धारी राम करतो; तो राम दासाचा अभिमानी कधीही उपेक्षा करत नाही.

Manache Shlok 35 Meaning — English

As is the feeling within one's heart, so does the divine dwell there. Rama, bearer of the bow, protects the wholehearted devotee; that Rama never forsakes his devotees.