॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ३९ जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे। जयाचेनि योगें समाधान बाणे॥ तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥

॥ ३९ ॥

मनाचे श्लोक ३९ अर्थ — मराठी

ज्याचे वर्णन वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात, ज्याच्या योगाने मनाला समाधान लाभते, त्याला हे सर्व मनाचे चांचल्य अर्पण कर; हे सज्जन मना, रामाच्या ठिकाणी वस्ती कर.

Manache Shlok 39 Meaning — English

The one whom the Vedas, scriptures and Puranas describe, by whom the mind finds contentment — surrender all your restlessness to Him; O good mind, take up your dwelling in Rama.