मना पाविजे सर्वही सूख जेथे। अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥ विविकें कुडी कल्पना पालटिजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥
॥ ४० ॥मनाचे श्लोक ४० मना पाविजे सर्वही सूख जेथे
मनाचे श्लोक ४० अर्थ — मराठी
जिथे सर्व सुख प्राप्त होते, तिथे अति आदराने लक्ष ठेवावे. विवेकाने वाईट कल्पना बदलून टाकावी; हे सज्जन मना, रामाच्या ठिकाणी वस्ती कर.
Manache Shlok 40 Meaning — English
Fix your attention with deep reverence there, where all happiness is found. Through discernment, transform every unwholesome thought; O good mind, take up your dwelling in Rama.