॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ४१ बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं

बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥ विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥

॥ ४१ ॥

मनाचे श्लोक ४१ अर्थ — मराठी

खूप भटकंती केली तरी खरे सौख्य मिळणार नाही; उगाच शिणावे लागते पण काही हित साधत नाही. विचाराने अंतःकरणाला चांगला बोध द्यावा; हे सज्जन मना, रामाच्या ठिकाणी वस्ती कर.

Manache Shlok 41 Meaning — English

However far you wander, true happiness will not come; you only tire without gaining any good. Counsel your heart well through reflection; O good mind, take up your dwelling in Rama.