मना जे घडी राघवेवीण गेली। जनीं आपुली ते तुवां हानि केली॥ रघूनायकावीण तो शीण आहे। जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे॥
॥ ४६ ॥मनाचे श्लोक ४६ मना जे घडी राघवेवीण गेली
मनाचे श्लोक ४६ अर्थ — मराठी
हे मना, जी घडी रघुनाथावाचून गेली, ती तू आपली हानीच केली असे समज. रघुनायकावाचून सर्व शीणच आहे; जो दक्ष असतो तो लक्ष लावून हे पाहतो.
Manache Shlok 46 Meaning — English
O mind, any moment that passes without Raghava — know that you have caused your own loss. Without Raghunayaka all is mere weariness; the watchful one sees this with full attention.