॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ४५ जयाचेनि संगे समाधान भंगे

जयाचेनि संगे समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे॥ तये संगतीची जनीं कोण गोडी। जिये संगतीनें मती राम सोडी॥

॥ ४५ ॥

मनाचे श्लोक ४५ अर्थ — मराठी

ज्याच्या संगतीने समाधान भंगते आणि अकस्मात अहंकार येऊन चिकटतो, त्या संगतीत कसली गोडी? जी संगत बुद्धीला रामापासून दूर नेते ती सोडावी.

Manache Shlok 45 Meaning — English

What sweetness is there in company that breaks your peace and suddenly fastens ego upon you? Abandon any companionship that draws the mind away from Rama.