सदा बोलण्यासारिखे चालताहे। अनेकीं सदा एक देवासि पाहे॥ सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
॥ ४९ ॥मनाचे श्लोक ४९ सदा बोलण्यासारिखे चालताहे
मनाचे श्लोक ४९ अर्थ — मराठी
जो सदा बोलल्याप्रमाणे वागतो, जो अनेकांत सदा एका देवालाच पाहतो, जो सगुणाची भक्ती करतो आणि ज्याच्यात भ्रमाचा लेशही नाही, तो सर्वोत्तमाचा दास जगात धन्य होय.
Manache Shlok 49 Meaning — English
One who always acts as he speaks, who sees the one God within the many, who worships the divine with form and holds not a trace of delusion — that servant of the Supreme is blessed.