नसे अंतरी काम नानाविकारी। उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥ निवाला मनीं लेश नाही तमाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥
॥ ५० ॥मनाचे श्लोक ५० नसे अंतरी काम नानाविकारी
मनाचे श्लोक ५० अर्थ — मराठी
ज्याच्या अंतरी नाना विकार निर्माण करणारी वासना नाही, जो उदासीन, तपस्वी आणि ब्रह्मचारी आहे, ज्याचे मन निवाले असून तमाचा लेशही नाही, तो सर्वोत्तमाचा दास जगात धन्य होय.
Manache Shlok 50 Meaning — English
One in whom no craving stirs its many distortions, who is detached, austere and self-restrained, whose mind is cooled and holds not a shade of darkness — that servant of the Supreme is blessed.