॥ श्रीराम ॥

श्री मनाचे श्लोक

श्री समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक ५१ मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी

मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी। प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥ सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥

॥ ५१ ॥

मनाचे श्लोक ५१ अर्थ — मराठी

ज्याने मद आणि मत्सराने भरलेली स्वार्थबुद्धी सोडली, ज्याला प्रपंचाची कोणतीही उपाधी नाही, ज्याचे बोलणे सदा नम्र आणि गोड आहे, तो सर्वोत्तमाचा दास जगात धन्य होय.

Manache Shlok 51 Meaning — English

One who has cast off selfish pride full of arrogance and envy, who is untouched by worldly entanglement, whose speech is ever humble and gracious — that servant of the Supreme is blessed.